News34 Chandrapur
चंद्रपूर - युवासेना प्रमुख,पर्यावरण,पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चंद्रपुर जिल्हा दौरा पार पडला यावेळी युवासेना सचिव वरून सरदेसाई,कार्यकारिणी सदस्य रूपेंश कदम, जिल्हा युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी, पुर्व विदर्भ सचिव हर्षल काकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांनी आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले. गेल्या काही दशकापासून जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शासकीय शाळा ह्या पटसंख्या कमी होत असल्याने संपूर्णतः बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि काही बंद हि झालेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासी/ मागासलेला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे या भागातील गोरगरिबांच्या मुलांना चांगले प्राथमिक शिक्षण मीळने हे सुद्धा अशक्य झाले आहे. इंग्रजी माध्यमांचे शाळेची फि हि भरमसाठ school fee असल्यामुळे या भागातील अधिकतर लहान मुले हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत व नाइलाजास्त्तव त्यांना child labour बालमजूरीसाठी प्रवृत्त व्हावे लागत आहे. आपल्या पुढाकाराने मुंबई मधील महानगरपालिकेच्या शाळा जश्या महाराष्ट्रात नावलौकिक करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. या शाळा जागतिक स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रातील प्रख्यात संस्थांशी जोडून त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पाउल उचलल्या जात आहेत. यासोबतच चंद्रपुर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखले जाते परंतु येथील स्थानिकांना रोजगार मिळत नाही ८०%टक्के स्थानिकांना सामावून घेण्याचा सरकारच्या निर्णयाला स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असून कंपण्याचे वरिष्ठ पदाधिकारी ठेकेदारांसोबत संगनमत करून मनमानी कारभार करीत आहेत त्यामुळे युवक बेरोजगारी मुळे पोटापाण्यासाठी पैसे कमविण्यासाठी चुकीच्या मार्गाने जात आहे याकडेही युवासेना जिल्हाप्रमुख प्रा निलेश बेलखेडे यांनी लक्ष वेधले व स्थानिक युवक युवतींना रोजगार, नोकर्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे हि विनंती निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात लवकरचं संबंधित मंत्री महोद्यय व अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन यावर उपाययोजना करू असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पुष्पगुच्छ तथा आराध्य दैवत माता महाकालीची प्रतिमा भेट देत युवासेना जिल्हाच्या पदाधिकारी वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम,विदर्भ महिला संघटिका शिल्पाताई बोडखे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे, मुकेश जिवतोडे, युवासेना विदर्भ सचिव नगरसेवक हर्षल काकडे, यांची सुद्धा उपस्थिती होती. Yuvasena news
