चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभिंयते व अधिकारी राज्यस्तरीय संघर्ष समितीच्या वतिने विज कर्मचारी संयुक्त कृती समिती Ctps चंद्रपूर द्वारा दि.१६.०२.२०२२ रोजी सुधारित विद्युत कायद्या-२०२१ ला विरोध, जल विद्युत केंद्र हस्तांतरण थांबविणे, देशात विज क्षेत्रांत होणारे Privatization थांबविणे इत्यादी मागण्याकरीता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जाभवन गेट समोर व्दारसभा घेण्यात आली.
या व्दारसभेला महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे शाखा अध्यक्ष विक्की राठोड, ग्रॅच्युएट इंजिनियर्स असोसिएशनचे विभागीय सचिव सुशील लांबट, सर्बोडिनेट इंजिनियर्स अशोसिएशनचे सहसचिव नितीन काळे, विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे उत्तम रोकडे, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे ज्ञानेश्वर बोकडे ,महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे मिलिंद कोटरंगे ,पावर फ्रंटचे अभय मस्के ,देवराव नवघरे, बहुजन पावर कर्मचारी संघटनेचे दिलीप मोहोड व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांने विस्तृत संबोधित केले.यावेळी द्वारसभेत विज कंपनीने नुकतेच बदली धोरणाचे आदेश काढले त्या आदेशाच्या प्रतची सर्वानी होळी केली.
द्वार सभेचे सुञसंचालन नरेंद्र रहाटे यांनी केले तर आभार अमोल मोंढे यांनी मानले या सभेला चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या संयुक्त समितीचे नवल दामले, देवराव कोंडेकर ,भैयाजी उईके, अनिल दौडकर,जयंत तायडे,पी एस आरिकर, सुभाष शेडमाके, सुनील भुयार,विजय राठोड , व सर्व सघंटनाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
