News34 Ghughus
घूग्घुस - घूग्घुस नगरपरिषदमध्ये ग्रामपंचायत होती तेव्हा पासून काम करीत असलेल्या स्थायी, अस्थायी स्वरुपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद घोषित होऊन एक वर्ष लोटून गेले असले तरीसुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही ही खूप दुर्दैवी बाब आहे.
याची दखल घेत आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा Assistant Labor Commissioner चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार आणि नगरपरिषद घूग्घुस ला सुद्धा तक्रार करत यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी म्हणून आम आदमी पार्टी सतत लढा देत आहे.या संदर्भात आज दिनांक १६/०२/२०२२ रोजी परत एकदा सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना भेटून चर्चा करत एक महिन्याचा कालावधी मध्ये जर या विषयाचा तोडगा निघाला नाही तर आम आदमी पार्टी घूग्घुस नगरपरिषद कर्मचाऱ्यांना घेऊन नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार अशी चेतावणी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व आम आदमी पार्टी शिष्टमंडळ द्वारा देण्यात आली व अश्याप्रकरचे शोषण आम आदमी पार्टी घूग्घुस होऊ देणार नाही अशी घोषणा केली. Aap Chandrapur
यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला सदस्य उमा टोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी, हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप,नईमा शेख,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, सागर बिऱ्हाडे,अनुप नळे, स्वप्नील आवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
