News34 Chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कुणाल एन्टरप्रायजेस कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत कामगार 58 वर्षीय भोजराज मेश्राम रा. वैद्यनगर तुकूम याला वाघाने उचलून नेले.बुधवारी रात्री काम आटोपून मेश्राम हे सायकलीने घरच्या दिशेने निघालो होते, मात्र अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने मेश्राम यांचेवर हल्ला चढवीत उचलून नेले, मेश्राम यांचा मृतदेह गुरुवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. Tiger attack
काही दिवसांपासून चंद्रपूर वीज केंद्र परिसरात वाघ फिरत होता याची माहिती वीज केंद्राने वनविभागाला दिली होती, याच दरम्यान वाघाच्या या हल्ल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.
या आधी सुद्धा एका बिबट्याने भर दिवसा लहान मुलीवर हल्ला चढविला होता त्यामध्ये ती मुलगी ठार झाली होती. Ctps chandrapur
