चंद्रपूर - 27 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, जिल्ह्यातील 1 लक्ष 59 हजार 712 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाचे आहे. oral polio vaccine
मोहिमेत सुटलेल्या बालकांना 2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे पोलियोचा डोज पाजण्यात येणार आहे. poliovirus जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि महानगर पालिका क्षेत्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 1 लक्ष 59 हजार 712 बालके आहेत. पल्स पोलियो लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागात 2059 बूथ, शहरी भागात 193 तर महानगर पालिका क्षेत्रात 302 असे एकूण 2554 बूथ करण्यात आले आहेत. बूथसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षकांची संख्या 517 आहे. Polio campaign गृहभेटीकरीता एकूण 2867 टीमचे गठन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागात 2549 टीम, शहरी भागात 129 आणि महानगर पालिका क्षेत्रात 189 टीमचा समावेश आहे. तसेच ट्रांझिट व मोबाइल टीमची संख्या अनुक्रमे 164 आणि 117 आहे. polio drops