News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शेतक-यांना आर्थिक मदत व्हावी,या उदेशाने सुरू करण्यात आलेल्या Prime Minister's Farmers Honor Scheme चा दहावा हप्ता शेतक-यंाना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे.मात्र शेकडो शेतक-यांनी त्यांचेखाते या योजनेशी आधार Link, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे.
आता या करिता 31 मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतक-यांची धावपळ सुरू झाली आहे.
केंद्र शासनाव्दारा देण्यात येणा-या दोन हजार रूपयांच्या मदती साठी अनेक नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतक-यांना 11 वा हप्ता मिळणार आहे. शेतक-यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बॅंक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. शेतक-यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे.यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. क्ेंद्र शासनाने सन 2019 मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी शेतक-यांनी Portal वर नोंदणी केलेली आहे.मात्र,अजून ब-याच शेतक-यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थीक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.
कसे कराल केवायसी:- मोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टलउघडून त्यावर फार्मर काॅर्नर पर्याय दिसेल. त्याखाली केवायसीवर क्लिक करा, ई-केवायसी Dashboard दिसेल, तेथे आधार व त्यांच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड OTP वर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.
KYC साठी 31 मार्च डेडलाइन:-
या योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतक-यंाना प्राप्त आहेत. मात्र,अकराव्या हप्तापूर्वी केवायसी करणे, बंधनकारक करण्यात आले आहे.यासाठी शेतक-यांना 31 मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे.शेतकरी आपल्या मोबाईलवरून किंवा सीएसी सेंटरवरून केवायसी करू शकतात, असे आवाहन कामॅन सर्वीस सेंन्टर चे संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी कळविले आहे
