News34 Korpana
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 17 फेब्रुवारी रोजी पार पाडली. यामध्ये काँग्रेसच्या सौ.नंदाताई विजय बावणे यांची नगराध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी कांग्रेसचे इस्माईल रसूल शेख यांचा 12 विरूद्ध 5 मतांनी विजय झाला. Congress win nagar panchayat
17 नगरसेवक असलेल्या कोरपना नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पडली.याठिकाणी सौ.नंदाताई बावणे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या असून काँग्रेसच्या झेंडा फडकल्याने फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे,गणेश गोडे,उत्तम पेचे, सिताराम कोडापे, भाऊराव कारेकर, नितीन बावणे,भारत चन्ने, सौ.छायाताई बोरडे आदींची उपस्थिती होती.यावेळी निवडणुक निर्णय अधीकारी म्हणून उपविभागिय अधिकारी संपत खराटे, नगरपंचायतचे प्रशासक डॉ.विशाखा शेळकी उपस्थित होते.
