News 34 Chandrapur
चंद्रपूर - संपुर्ण आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामुळे चंद्रपुरकर जीवघेण्या प्रदूषणाने त्रस्त असतानाच आता प्रदूषित पाण्याची नवी समस्या उभी ठाकली आहे.
thermal pollution
thermal pollution
विजकेंद्रातील मळ मिश्रीत दूषित पाणी इरई नदीत सोडण्यात येत असल्याने व तेच पाणी रामनगर पंप हाऊस मधून प्रक्रिया करून अर्ध्या शहराला पुरवठा केल्या जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ सध्या प्रदूषण निमंत्रण मंडळ झाल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. Water pollution
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी तुकुम येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे.या जलशुद्धीकरण केंद्रातून अर्ध्या शहराला पाणी पुरवठा होतो. तर रामनगर,सिव्हिल लाईन्स या परिसरात दाताळा मार्गावरील रामनगर पंप हाऊस मधून पाणी पुरवठा होतो. रामनगर पंप हाऊस मधून होणारा पाणीपुरवठा सध्या वेगळ्याच समस्येने ग्रासला आहे.
इरई नदीतून हे पाणी उचलले जाते. मात्र आता इरईचे पात्र पूर्णतः प्रदूषित झाले आहे. या पात्रात विजकेंद्रातील मळीयुक्त पाणी तसेच उर्जानगर वसाहतीमधील सांडपाणी या नदीत सोडले जाते. यशवंतनगर पडोली येथे पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळ हे पाणी मिळत असल्याने तेथेही प्रदूषित पाणी पुरवठा होतो.पुन्हा उर्वरित पाणी नदीमार्गे छोटा नागपूर पुढून दाताला पंप हाऊसपर्यंत येते व तेच पाणी रामनगर पंप हाऊस मध्ये घेतले जाते.येथे होणारी प्रक्रिया योग्य प्रकारे होत नसल्याने ते प्रदूषित पाणी रामनगर व सिव्हिल लाईन्स परिसरातील कुटूंबाना पुरविल्या जाते. Irai river pollution
विशेष म्हणजे उर्जानगर जलशुद्धीकरण केंद्रात दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याचे Sewage treatment plant आहे. मात्र तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे दृष्टीस पडते.मळी याच प्लांट जवळ जमा करण्याचे टाके आहेत.मात्र तेथे मढ जमाच होत नसल्याने तो याच परिसरात असलेल्या नाल्यात सोडल्या जाते व ते पाण्यात प्रवाहित होऊन इरईचे पाणी प्रदूषित करते.हे सर्व प्रदूषित पाणी चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात घालत आहे.
या संदर्भात इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक व वृक्षाईचे संस्थापक कुशाब कायरकर यांनी प्रत्यक्ष उर्जानगर सिव्हरेज प्लांट वर भेट देऊन तेथील प्रक्रिया सयंत्रांची पाहणी केली असता भीषण वास्तव समोर आले. Polluted water
या प्रकाराने आता प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण मंडळ सध्या प्रदूषण निमंत्रण मंडळ झाले असून याकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कुशाबराव कायरकर यांनी केली आहे.
