News34 Korpana
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी विजय बावने यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून काँग्रेसच्या 12 उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे.
17 सदस्य असलेल्या या नगरपंचायतसाठी नूकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात काँग्रेस 12,भाजपा 4 आणि शेतकरी संघटनेचा 1 उमेदवार निवडून आलेले आहे.11फेब्रवारी रोजी याठिकाणी नगराध्यक्ष व उपाध्यक्षची निवड होणार आहे. Mayor election नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका वढवणारे विजय बावने यांच्या पत्नी सौ.नंदाताई बावने ह्या दुसऱ्यांदा बिनविरोध नगराध्यक्ष पदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ? तसेच उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचे इस्माईल शेख यांची वर्णी लागणार ? हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा असून क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या सोबत चर्चेनंतरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. The third generation of the Bawane family
विजय बावने यांचे वडिल स्व.चिंतामणराव बावने हे 1962 साली कोरपना ग्रामपंचायतचे पहिले सरपंच होते.दुसरी पिढी म्हणून 1989 मध्ये विजय बावने यांनी याठिकाणी सरपंच पद भूषविले.यानंतर ग्रामपंचायत विसर्जित होवून नगरपंचायत उदयास आली. 2016 मध्ये येथे पहिली नगरपंचायतची सार्वात्रिक निवडणूकी पार पडली.यामध्ये विजय बावने यांच्या पत्नी सौ.नंदाताई बावने यांना पहिल्या महिला नगराध्यक्षाचा मान मिळाला.यंदाच्या सार्वत्रिक निवडणूकीत बावने यांच्या पत्नीसह पुत्र नितिन बावणे सुद्धा निवडून आले आहे.नितीनच्या रूपात बावने परिवाराची तिसर्या पिढीने राजकारणात जोरदार एन्ट्री करून इतिहास रचला असून पहिल्यांदाच आई आणि पुत्र कोरपना नगरपंचायतचा कारभार सांभाळणार हे मात्र विशेष. Congress
