News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मागील नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने मुल व सावली तालुक्यातील धान पिकाचे फार मोठे नुकसान केले.
सतत पाच सहा दिवस शेतकऱ्यांचे कापलेले धान पाण्यात बुडन राहिल्याने धान लाल झाले त्यामुळे कोणी घायला तयार नाही तोंडात आलेला घास गेला. शेतकऱ्यांचे खरीप पीक हातातून गेले. शेतकरी हवालदिल होऊन खचला. शेतकऱ्यांचे धान बांधितच कोंब निघून वापुन गेले. उत्पन्न अर्ध्यापेक्षाही कमी झाले. जे हाती आले तेही व्यापारी घ्यायला तयार नाही धान लाल पडल्यामुळे आजही शेतकऱ्यांचे धान घरीच पडले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजूनही धान कापणी - बांधणीचे व चुरण्याचे पैसे देने बाकी आहे. आपसी उसनवरीने घेतलेले पैसे देणेच आहे.
पैसे कुठून आणावे या विवंचनेत शेतकरी सापडला असतांना सहकारी सोसायटी मधून व सहकारी आणि National Bank राष्ट्रीयीकृत बँकामधून हंगामाच्या पूर्वी घेतलेले पीक कर्जाची रक्कम माहे मार्च २०२२ च्या भरणा करावयाचा आहे. असा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर असतांना केंद्र व राज्य शासनाकडून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा मुल-सावली-सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे एकही पैसे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी येणार असल्याची प्रतिक्रिया सावली-मुल तालुक्यातील अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे. Damage from unseasonal rains
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी व धीर देण्यासाठी त्यावेळी तात्काळ राज्याचे कृषिमंत्री नाम.दादा भुसे व मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांनी मुल तालुक्यातील चिमढा, टेकडी, सावली तालुक्यातील सावली,खेडी व इतर गावातील शेतकऱ्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीत येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि घाबरू नका महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी आहे असे सांगून धिरही दिले तेव्हा बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु चार महिने लोटून गेले तरी देखील शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई आणि पीक विमा कम्पनिकडून काहीही मदत देण्यात आलेली नाही. नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि विम्याचे पैसेही मिळाले नाही. फक्त शेतकऱ्यांच्या समाधानासाठी विमा कंपणीच्या प्रतिनिधी कडून व शासनाच्या महसूल विभागाच्या मार्फतीने तलाठी कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा सातबारा व बँक पासबुक सुद्धा मागविले आहे.परंतु नुकसान भरपाईचा अजूनही पत्ता नाही. आणि मिळेल की नाही हेही कोणी बोलायला तयार नाही. तरी देखील येत्या ३१ मार्च २०२२ महिन्याच्या आत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत भरणे आहे करिता शासनाने शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचे पैसे त्वरित जमा करावे आणि केंद्र व राज्य शासनानेही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या आत नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अन्यथा पीक कर्जाची रक्कम तरी माफ करावी अशी विनंती शेतकरी बाधवांनी केली आहे. अशा वेळी तरी शासनाला शेतकऱ्यांची दया यावी.

