चंद्रपूर - जिल्ह्यात रेतिघाटाचे लिलाव प्रलंबित असताना मागील अनेक वर्षापासून पठाणपुरा गेटबाहेर वाळू माफियांनी मोठे जाळे विणलेले आहे.
पठाणपुरा गेट बाहेर इराई नदीच्या पात्रातून रोज हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा होत आहे, हा उपसा अनेक वर्षांपासून सुरू असून सुद्धा महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याचे सोंग करीत आहे.
Sand mafia
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज ट्रॅक्टर वर रेती भरत असताना 50 वर्षीय मारोती गेडाम या मजुरांचा रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.
मजूर ढिगाऱ्याखाली दबल्यावर फक्त त्याचा हात बाहेर होता असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले, इतकेच नव्हे सदर बाब कुणाला कळू नये यासाठी पोलिसांना सम्पर्क न साधता स्वतः वाळू माफियांनी मृतदेह उचलत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. Illegal
मृतक मारोती हा नांदगाव पोडे या ठिकाणी राहतो.
मृतकांच्या कुटुंबियाला आधी माहिती देण्यात आली नव्हती, माहिती मिळाल्यावर मृतकाची पत्नी व 2 मुले जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले.
पतीचा मृतदेह बघताच पत्नीने हंबरडा फोडला.
मृतक कुटुंबीयांतर्फे 10 लाखांची आर्थिक मदतीची मागणी केली मात्र ट्रॅक्टर मालक बनकर यांनी 1.50 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली.
मृतक मारोती हा मागील 10 महिन्यापासून बनकर यांच्याजवळ काम करीत होता.
या संदर्भात तहसीलदार निलेश गौड यांच्याशी संपर्क साधला असता मी पोलिसांसोबत बोलतो म्हणत फोन ठेवला, वृत्त लिहेपर्यंत एकही प्रशासनिक अधिकारी सामान्य रुग्णालयात दाखल झाला नव्हता.
पठाणपुरा गेट बाहेरील इराई नदीचे पात्र हे वाळू माफियांसाठी जणू स्वर्गच आहे, याठिकाणी रेती साठा मोठ्या प्रमाणात असून वाळू माफिया बिनधास्तपणे JCB लावून रोज मातीचा अवैध उपसा करतो.
या ठिकाणी तब्बल 30 रेती ट्रॅक्टर मालकाचा दबदबा अनेक वर्षांपासून कायम आहे.
या वाळू माफियावर कारवाई करण्याची हिंमत चंद्रपूर जिल्हा प्रशासन दाखविणार काय?