News34 sindewahi
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील मोहाळी नलेश्वर ते पांगळी फाट्यावर जवळ इंदिरानगर (नंलेश्वर )परिसरात चारचाकी वाहनाने सायकल चालकास धडक दिली असता त्यात तो ठार झाला.
Road accident
27 फेब्रुवारीला संध्याकाळ च्या सुमारास रमेश मडावी वय -55 रा. इंदिरानगर कुकुळहेटी ता.सिंदेवाही हा जवळील मोहाळी बाजारात काही सामान आणण्यास सायकल घेऊन गेला होता, सामान घेतल्यावर तो स्वतःच्या गावाकडे bicycle ने परत येताना मोहाळी (नलेश्वर) ते पांगळी फाट्या जवळ चारचाकी वाहन क्रमांक एम एच-34 एम 8244 ने सायकलस्वारास धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या रमेश मडावी याला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रमेश मडावी यांचा मृत्यू झाला. सिंदेवाही पोलिसानी पांगळी फाट्याजवळ घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. धडक दिल्यावर घटनास्थळा वरून चारचाकी वाहन क्रमांक एम एच-34 एम 8244 सदर चार चाकी वाहनाचा चालक पसार झाला होता. चालक आरोपी वर 279, 337, 304(अ)भादंवि व सहकलम 184 मोवाका नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोवे हे करीत आहेत.