गडचांदूर :- कोरपना तालुक्यात हल्ली सतत लहानमोठे Accident घडत आहे.याच पार्श्वभूमीवर नांदाफाटा येथे 1 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक भाजी विक्रेती महिला चारचाकी हात ठेला घेऊन नांदाफाटा चौकाकडे जात असतांना गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या एका बाईकस्वाराने या महिलेला मागून जोरदार धडक दिली होती.
माणुसकी म्हणून बाईकस्वाराने महिलेला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायचे होते मात्र असे ना करता त्याने तेथून पळ काढला.सदर घटना Cctv मध्ये कैद झाल्याने ओळख पटवून बाईकस्वारा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर महिलेचा पाय दोन ठिकाणी तुटला असून सध्या तिच्यावर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून बाईकस्वाराकडून आर्थिक मदत मिळालेली नाही.मात्र नांदा येथील शिवस्मारक समितीच्या युवकांनी पुढाकार घेऊन 'एक हात मदतीचा' म्हणून त्या महिलेला रोख 25 हजार रूपयांची मदत केली आहे. Vegetable seller woman accident
सदर दुचाकीस्वार अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत स्थाई नोकरीवर असून 1 फेब्रुवारी रोजी तो पहाटेच्या सुमारास गडचांदूर वरून कंपनीत ड्युटीवर येत असताना ही घटना घडली.घटनेच्या दिवशी येथील काही राजकीय लोकांनी सदर प्रकरणात मध्यस्थी करून financial support मिळवून देण्याचे आश्वासन देत महिलेला उपचारासाठी चंद्रपूरला पाठवल्याची माहिती आहे.मात्र दिलेल्या आश्वासना प्रमाणे आजतागायत मदत मिळाली नसल्याने अपघातग्रस्त महिला आर्थिक अडचणीत सापडली आहे. पायाला जबर दुखापत झाल्याने किमान वर्षभर तरी तिला उपचार घ्यावा लागणार आहे.सध्याच्या परिस्थितीत या महिलेच्या मदतीसाठी नांदा येथील 'शिव स्मारक समिती' च्या युवकांनी पुढाकार घेत तिला उपचारासाठी 25 हजाराची मतत केली आहे.यापुढेही मदत करण्याची तसेच महिलेला अपघात विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन समितीतर्फे देण्यात आले आहे. मदत करण्याऐवजी दुचाकीस्वाराने जखमी महिलेला सोडून पळ काढला मात्र हे युवक मदतीसाठी धावून आले आहे. Shiv Smarak Samiti