News34 Chandrapur
कोंढा - चालबर्डी गावालगत वेकोलीची सर्वात मोठी कोळसा खाण सुरू होणार असल्याची एक वर्षाअगोदर बातमी प्रकाशित होताच दलाल सक्रिय झाले आहे.सततची नापिकी आणि पिकलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत,याचाच फायदा काही दलाल घेत असल्याचं गावातील सुशिक्षित नागरिक प्रवीण ठाकरे यांच्या लक्षात आले.
लवकरच सेक्शन ४ लागणार असल्याची माहिती दलालांना मिळताच सक्रिय झाले आणि शेतकऱ्यांच्या निरक्षरता आणि आर्थिक अडचणीत असल्याचा फायदा घेत शेतकऱ्यांना दलालांनी मोठ्या मोठ्या अपेक्षा दाखवत कवडीमोल भावाने शेतकऱ्यांची शेतजमिनी विक्री करून दिली. वेकोलिमध्ये wcl chandrapur जमिनी गेल्यास योग्य भाव आणि नोकरी मिळणार हे दलालांना माहिती आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सुरू आहे.लवकरच सेक्शन ४ सुरू होणार असून आपल्याला योग्य भाव आणि नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे,तरी कोंढा चालबर्डी क्षेत्रात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी कुठल्याही अमिषाला बळी पडून आपली जमीन विक्री करू नये,तसेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण एकजूट होऊन लढा देऊ असे आवाहन अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष श्री संदिप कुटेमाटे, अनुप कुटेमाटे संस्थापक ,प्रवीण ठाकरे,प्रदीप डोंगे, अमोल क्षिरसागर,सचिन डोंगे,विनोद ठोंबरे आणि मोहन दर्वे यांनी केले आहे. Chandrapur news
