News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल नगर विकासाचा सत्ताधाऱ्यांकडून सर्वत्र डंका वाजवील्या जात असला तरी देखील नगरातील अनेक वार्डात अजूनही समस्या प्रलंबित असून रेंगाळत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. म्हणून कांग्रेसतर्फे वॉर्ड निहाय समस्या जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला असून कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मुल येथील वार्ड नंबर -२ मधील नागरिकांशी व अधिकाधिक महिलांशी प्रत्यक्ष चर्चा करून वार्डातील समस्या समजून घेतल्या. महिलांकडून समस्या समजून घेताना मुल तालुका congress कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, उपसभापती संदीप कारमवार, महाराष्ट्र राज्य स्तरीय ओबीसी कांग्रेस सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, मुल शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी, महिला कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, प्रतिष्ठीत महिला संगीता नागपुरे, माधुरी मंगर, यांचेसह महिला कांग्रेसच्या सदस्य, तालुका कांग्रेसचे व कांग्रेस युवक कार्यकर्ते उपस्थित होते. मूल नगरातील आमच्याच नाही तर अनेक वार्डात महत्वपूर्ण समस्या आजही प्रलंबित आहेत. नगर परिषद पदाधिकारी यांचा कालावधी पूर्ण झाला तरी रस्ते, नाल्या, बेघर आणि वॉर्ड सौंदर्यीकरण अजूनही झालेले नाही. नालीतील कचरा लगेच फेकल्या जात नाही,अजूनही वार्डात गावठी डुकरे हैदोस तसेच रस्त्यावर मोकाट जनावरे दिसत आहेत. गावठी डुकरे व कुत्रे गावाबाहेर हाकलण्यात का आलेले नाही असा प्रश्नही नागरिकांनी केला. Chandrapur news
काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे आजही काही नागरिकांना पाणी मिळत नाही. भेदभाव होत असल्याचेही सांगितले. नाल्यामध्ये फवारणी होत नसल्याने आरोग्याच्याही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्याही भावना महिलांनी बोलून दाखविल्या. याच निमित्ताने महिला बचत गटांना CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकारातून बँकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम केले जात असल्याची माहिती देण्यात आली तसेच स्व.राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेतून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार उभारुन कुटुंबाचा उदर निर्वाह सुद्धा करीत असल्याचे सांगितले.
