बल्लारपूर - महिलांनी घरबसल्या शॉपिंग अत्यन्त सोपी व्हावी यासाठी सध्या देशभरात Meesho Online Shopping महिलांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
मात्र आता ह्या online app वर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
असाच एक प्रकार बल्लारपूर शहरात एका युवतीची फसवणूक meesho online shopping च्या माध्यमातून झाली असल्याचे उघडकीस झाले आहे.
नोकरीवर असलेल्या युवतीने पगारातून साडी order केली मात्र साडी ऐवजी त्या युवतीला चिंध्याची डिलिव्हरी झाली.
महागड्या साड्या कमी किमतीत मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने तेराशे रुपये किमतीची साडी अगोदरच पैसे देऊन बुक केली तीन-चार दिवसात एक छानसा डबा आला नवीन साडी ची उत्सुकता होतीच डबा काढल्यानंतर त्यात मात्र रंगीबेरंगी कपड्यांचे तुकडे आढळून आले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवतीने दिलेल्या नंबर वर फोन केला असता संपर्क होत नव्हता त्यानंतर कंपनीकडे E-Mail द्वारा तक्रार करण्यात आली कंपनीने पैसे परत मिळणार असे आश्वासन दिले पण बरेच दिवस लोटूनही रक्कम मिळाली नाही.
ऑनलाईन वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन या युवतीने केलेले आहे.


