चंद्रपूर - 24 फेब्रुवारीला शहरातील बाबूपेठ येथील टॉवर टेकडी परिसरात राहणाऱ्या मोहूर्ले परिवार व खंडाळकर, सिडाम व बावणे यांचा वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने प्रकरण रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहचले.
सचिन मोहूर्ले यांनी लहान मुलांच्या वादात मला खंडाळकर, सिडाम व बावणे यांनी मारहाण केली इतकेच नव्हे तर माझ्या डोक्यावर विटेने प्रहार केला.
शेजारी आमच्या परिवाराला नाहक त्रास देत आहे, आम्ही नव्या घराचे बांधकाम केल्यापासून शेजारी लहान गोष्टीवरून मोठा वाद निर्माण करतात असा आरोप मोहूर्ले यांनी पत्रकार परिषदेत लावला होता.
मोहूर्ले यांचे आरोप धादांत खोटे आहे, ती वीट त्यांनी स्वतः आपल्या डोक्यावर मारत आमच्या विरोधात खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिली असल्याची माहिती tower टेकडी वासीयांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
मोहूर्ले कुटुंबीय गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, ते दारू व गांजाचा अवैध धंदा परिसरात करीत असल्याचा आरोप नागरिकांनी लावला.
त्यांनी जे बांधकाम केलं ते परिसरातील मोकळ्या जागेवर मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण साठी राखीव ठेवलेल्या जागेवर, त्यांनी बांधकाम केल्याच्या दिवसापासून त्या ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकाम ज्यावेळी त्यांनी सुरू केले तेव्हा आम्ही परिसरातील नागरिकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्हाला जे करायचं ते करा असा दम आम्हाला दिला. Rejected Tehsildar's orders
याबाबत आम्ही महानगरपालिका व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली तहसीलदार यांनी तात्काळ बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते, मात्र तहसीलदार यांचे आदेश मोहूर्ले परिवाराने धुडकावून लावले.
24 फेब्रुवारीला जो वाद झाला त्यामध्ये काही व्यक्ती उपस्थित नव्हते त्यांच्यावरही False crimes खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, परिसरातील नागरिकांना दारूच्या नशेत अश्लील भाषेत शिवीगाळ करणे वाद करणे हे त्यांचा नित्यक्रम झालेला आहे, त्यांनी केलेले अवैध बांधकाम तात्काळ काढावे अन्यथा आम्ही वार्डवासी आंदोलन करण्यासाठी तयार राहू असा इशारा नागरिकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
