News34 Bhadrawati
भद्रावती - मार्च - एप्रिलमध्ये होणा-या दहावी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर चक्क शिक्षण खात्याची माध्यमिक विभागात मान्यता नसणारे शिक्षक तपासणार असल्याने मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्यता नसणा-या शिक्षकांकडून बोर्डाचे पेपर तपासण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाचे नागपूर विभागीय सचिव देविदास जांभुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
जांभुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, माध्यमिक शाळांमध्ये पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी दहावीला शिकविणारे शिक्षक यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे. Department of Education त्या - त्या प्रमाणात त्यांच्या विभागातील शिक्षकांना मान्यता प्रदान करते. तसेच त्यांच्या Pay scale सुद्धा वेगवेगळ्या आहेत. पूर्व माध्यमिक विभागातील शिक्षकांना त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता वाढविली तर माध्यमिक विभागात उन्नत करुन त्यास शिक्षण विभागाची मान्यता घेण्यात येते. तेव्हाच तो माध्यमिक शिक्षक गणल्या जातो.
शासनाच्या नियमाप्रमाणे Paper checking teachers हे Secondary teacher असावेत आणि दहावीच्या वर्गाला त्या - त्या विषयाच्या अध्यापनाचा अनुभव असावा. परंतू नियम पायदडी तुडवून शिक्षण खात्याची मान्यता नसणा-या शिक्षकांची परिक्षक म्हणून बोर्डाने नियुक्ती केलेली आहे. असेच काम नागपूर बोर्डातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात पालक संघटनांनी याविरोधात न्यायालयात आवाज उठविला तर शासनावर नामुष्की ओढवणार आहे हे तेवढेच सत्य आहे. माध्यमिक विभागात शिक्षण खात्याची मान्यता नसणा-या शिक्षकांकडून पेपर तपासणीचे काम काढून घेऊन योग्य त्या शिक्षकांकडून करून घेण्याची मागणी जांभुळे यांनी केली आहे. Teacher
यासंबंधीच्या तक्रारी, निवेदने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे जांभुळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
