चंद्रपूर - शहरातील इंदिरानगर, कृष्णा नगर, संजय नगर, श्याम नगर, बंगाली कॅम्प, आंबेडकर नगर, बाबुपेठ, अष्टभुजा, रय्यतवारी काॅलरी, महाकाली काॅलरी, शास्त्रकार नगर, फुकट नगर व इतर भागात नजूलच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना जागेचे स्थायी पट्टे देण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे Minister of Revenue मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार, मा.आम.सुधिरभाऊ मुनगंटीवार अध्यक्ष लोकलेखा समिती विधिमंडळ मुंबई, खासदार बाळु भाऊ धानोरकर, आमदार किशोर भाऊ जोरगेवार,यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांच्या वतीने देण्यात आले.Backyard premises
चंद्रपूर शहरातील अति मागास परिसर म्हणून ओळखल्या जाणारा इंदिरानगर, कृष्णा नगर, संजय नगर, श्याम नगर, बंगाली कॅम्प, आंबेडकर नगर, बाबुपेठ, अष्टभुजा,लालपेठ,रय्यतवारी काॅलरी हा भाग नजूलच्या जागेवर बसला आहे. मागील ४० ते ५० वर्षापासून सदर नागरिक येथे वास्तव्यास आहे. असे असले तरी त्यांना जागेचे स्थायी स्वरुपी पट्टे मिळाले नसल्याने जवळपास हजारो लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना, शैक्षणिक व बँक या सह अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यांना त्यांच्या हक्क अधिकारांपासून वंचित ठेवल्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून या परिसरातील नागरिकांसाठी पट्टे देण्याचे अभियान राबवा अशी या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. land leases
त्यामुळे लवकरात लवकर या परीसरातील नागरीकांना स्थायी स्वरूपी पट्टे देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.
