चंद्रपूर - कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषि उर्जा धोरण Mahakrishi Energy Policy २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील–चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणा-या चंद्रपूर, वरोरा,चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडचिरोली व आलापल्ली विभागातील आजपर्यंत एकंदरीत ४२ हजार ६८५ कृषिपंप ग्राहकांनी (ऑक्टोबर २०२० पासून) पासून ३९ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तिच्या दिशेने पाउुले टाकले आहेत तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखाचा भरणा करुन आपले वीजबिल कोरे करुन घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. Msedcl
या सर्व कृषिग्राहकांना वीजबिल थकबाकीवर सूट, विलंब आकार व व्याज अशी एकत्रित ७३ कोटी ४५ लाखांची माफी मिळाली आहे. सर्व थकबाकीमुक्त कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याचेप्रमाणपत्र महावितरणतर्फे देण्यात आले आहेत. थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांनी थकबाकीमुक्त होत ही संधी उपलब्ध करुन दिल्याबाददल उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व महावितरणचे आभार मानले आहे. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून Agricultural pump holder कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षाकरीता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरुन संपुर्णपणे थकबाकीमुक्त होण्याची संधी मा. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेतून उपलब्ध झाली आहे. आपले वीजबिल शुन्य करुन घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेणाऱ्या चंद्रपूर परिमंडळातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या या कृषि आकस्मिक निधी म्हणून एकंदरीत वीजबिलाच्या ४४ कोटी ३१ (एप्रिल २०२० पासून) लाखाच्या रक्कमेतून ६६ टक्के म्हणजे एकूण २९ कोटी २५ लाख हे कृषिग्राहकांच्या चंद्रपूर आणि गडचिरेाली जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी कृषिपंपधारकांनीच उपलब्ध करुन देत महावितरणप्रति विश्वास दाखविला आहे. यामधून चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.या योजनेच्या प्रतिपुर्तीसाठी व यशस्वितेसाठी महावितरणचे अभियंता, कर्मचारी हे प्रत्यक्ष कृषिग्राहकांच्या बांधावर, घरी व ठिकठिकाणी मेळावे, तसेच सायकल रॅली आदी घेत योजनेबददल समजावून सांगत योजनेत सामावून घेत आहेत. तसेच कृषिपंपाच्या वीजबिलाच्या आलेल्या तक्रारींचे तात्काळनिवारण करुन देत आहे त्यामुळे या योजनेस चांगला प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. Arrears
चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ७१८ ग्राहकांना त्यांच्या सप्टेंबर २०२० पर्यंतच्या २३३ कोटीच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची सूट व सोबतच २१ केाटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होवून १९२ कोटी अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी योजनेच्या पहिल्या वर्षात म्हणजे ३१ मार्चपर्यंत निम्मिच रक्कम म्हणजे ९६ कोटीच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. ९६ कोटीची वीजबिलमाफी, वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची सूट व सोबतच २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी असे एकत्रिपणे कधी नव्हे ती १३६ कोटीची माफी या योजनेमुळे चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयातील कृषिग्राहकांचे माफ होणार आहेत. आजपर्यंत ४२ हजार ६८५ म्हणजे ५३ टक्के कृषिग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्याच्या दिशेने पाउुल टाकले. तसेच २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी म्हणजे २५ टक्के कृषिग्राहकांनी आपले वीजबिल कोरे करुण घेण्याची संधी साधली आहे. Electricity bill waiver
