News34 chandrapur
नागभीड/तळोधी - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसात 2 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे, पहिली घटना चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात भाऊजी ने साळ्याला संपविले तर दुसऱ्या घटनेत लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचत खून केला. Crime murder
तळोधी बाळापूर येथिल भट्टी वार्ड क्रमांक 4 मधील झेंडा चौकात 65 वर्षीय राजेश्वर भिवाजी जुमडे यांचे लहान भाऊ 62 वर्षीय बंडू भिवाजी जुमडे यांनी भर चौकात दगडाने ठेचत खून केला. murder case
कुटुंबातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचे बोलले जात आहे, दोघा भावांचा आपसात जुना वाद होता.
मोठा भाऊ राजेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तळोधी बाळापूर येथील ए.पी.आय, डि.आर. शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अधिक तपास पि.एस.आय, आकाश कुमार साखरे, सहाय्यक फौजदार बलदारखा पठान, हवालदार पानसे, हवालदार आंबेकर, पो.कांस्टेबल निंबेकर हे करीत आहेत.
