News34 chandrapur
चंद्रपूर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २६) काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा येथील शकुंतला लाॅन येथे पार पडला. या मेळाव्यात महानगरपालिकेतील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक प्रदीप डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साफिया तवंगर, सामाजिक कार्यकर्ते अखिल कुरेशी, एआयएमआयएमचे इरफानभाई, महाकाली वार्डातील भाजपचे महादेव आरेवार यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचा दुपट्टा टाकून या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Mahavikasa aghadi
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षांत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अनेक नवीय योजना सुरू केल्या आहेत. त्यासोबतच पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी जिल्ह्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि केंद्र सरकारचे अपयश घराघरांत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. Bsp corporator join congress
यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार अविनाश वारजुरकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे टिकाराम कोंगरे, काँग्रेसचे ग्राणीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते.