चंद्रपूर - टॉवर टेकडी परिसर बाबूपेठ येथे 24 फेब्रुवारीला लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांचे मारहाण प्रकरण घडले, वाद विकोपाला गेल्यावर एकाने दुसऱ्यावर वीट मारून हल्ला केला.
Justice
चंद्रपूर मनपात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या 25 वर्षीय सचिन मोहूर्ले हा सकाळच्या सुमारास लहान भाऊ नागेश मोहूर्ले यांच्या पान ठेल्यावर खर्रा खायला गेला असता त्यावेळी काही लहान मुलांचे भांडण व मारहाण सुरू होती, हे बघताच सचिन मोहूर्ले यांनी कशाला भांडता असे म्हणत त्यांचे भांडण सोडविले.
मात्र त्याठिकाणी हेमंत बावणे व सुनील सिडाम हे हजर होते, हेमंत बावणे यांनी सचिन मोहूर्ले यांची कॉलर पकडत वाद सुरू केला. शेजारी बंडू खंडाळकर याने विट उचलत सचिन च्या डोक्यावर मारली.
वीटेच्या प्रहराने सचिन रक्तबंबाळ झाला, या मारहाणीची रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली.
बंडू खंडाळकर, सुनील सिडाम व हेमंत बावणे यांच्यावर कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सचिन मोहूर्ले यांनी पत्रकार परिषद घेत परिसरातील नागरिकांवर आरोप केले, मागील काही वर्षांपासून परिसरातील काही नागरिक आम्हाला नाहक त्रास देत असून बहिणीला पण वाटेल ते बोलत असतात.
मारहाणीची तक्रार द्यायला रामनगर पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी उलट आम्हालाचं धमकावीत तुझी नोकरी खाऊन टाकेल, जास्ती बोलला तर आत टाकणार अशी धमकी सुद्धा दिली.
पत्रकार परिषदेत मोहूर्ले परिवाराने मागणी केली की आमच्या जीवाला मारहाण करणाऱ्या पासून धोका आहे, जर कारवाई झाली नाही तर आम्ही परिवारासाहितआत्महत्या करू असा इशारा यावेळी मोहूर्ले परिवारानी दिला.
