चंद्रपूर - वनजमिनिवर असलेले अतिक्रमण हटविण्याचे काम सध्या वनविभागामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रशासनासमोर आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वनजमिनिवर शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांवर वनविभाग अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत आहे, हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सुद्धा वनविभागाने केराची टोपली दाखवली आहे.
गोंडपीपरी येथील आकसापूर व करंजी या गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या वनजमिनिवर अतिक्रमण काढण्याची तयारी वनविभागाने दाखवली आहे.
याबाबत गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपली आपबिती सांगितली.
विशेष म्हणजे गोंडपीपरी तालुक्यातील करंजी हे गाव पालकमंत्री विजय वडेट्टीवार Native place यांचं जन्मगाव आहे, या गावातील नागरिक मागील 90 ते 95 वर्षांपासून वनजमिनिवर शेती करीत आहे, करंजी गावातील शेतकऱ्यांना सदर जमिनी ह्या Bhudan movement भूदान चळवळी दरम्यान Vinoba Bhave यांच्या उपस्थितीत जमिनीचे वाटप करण्यात आले होते.
मात्र आता त्या जमिनीवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाने फतवा काढला आहे, यावेळी समीर निमगडे यांनी सांगितले की आम्हाला शेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, आम्ही जगायचं की मरायचं अशी पाळी आमच्यावर आली आहे.
आम्ही वर्ष 2007 मध्ये वनहक्क दावे सादर केले मात्र प्रशासनाने वेळोवेळी त्रुट्या काढत आम्हाला पट्टे देण्यास असमर्थता दाखवली.
प्रशासनाने तीन पिढ्यांचे दाखले सादर करायला सांगितले, आम्ही सादरही केले मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही.
जर आम्हाला वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही तर आम्ही याबाबत मोठे आंदोलन उभारू असा इशारा निमगडे यांनी यावेळी दिला.
