NEWS34 chandrapur
चंद्रपूर - गत 24 तासात जिल्ह्यात 71 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 31 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. Corona news
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 4, चंद्रपूर 6, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 5, नागभीड 3, सावली 1, चिमूर 1, वरोरा 4, कोरपना 2 तर जिवती येथे 3 रुग्ण आढळून आले असून बल्लारपूर, सिंदेवाही, मुल,पोंभूर्णा,गोंडपिपरी, राजुरा व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये भद्रावती तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. Chandrapur corona update
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 831 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 25 झाली आहे. सध्या 241 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 66 हजार 59 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 65 हजार 428 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1565 बाधितांचे मृत्यू झाले आहे. corona news headlines
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. corona news live
