News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत,परंतु ते विदर्भातले नाही. सर्व राजकीय पक्ष विदर्भासाठी लढत नाही, म्हणून जय विदर्भ सेनेचा जन्म झाला आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आम्ही लढा उभारणार असून या साठी मुख्यमंत्र्यांना 19 मागण्याचे निवेदन देणार असल्याची माहिती जय विदर्भ सेनेचे अध्यक्ष रमेश बिसेन यांनी मंगळवार 22 फेब्रुवारीला पत्रपरिषदेत दिली.
यावेळी जय विदर्भ सेनेचे स्मिता रायपुरे,नामदेव तराळे, महेंद्र पाटील,मीरा कटरे,सुजाता रंगारी व सुरेष चवलढाल यांची उपस्थिती होती.
Independent vidarbha
यावेळी बिसेन यांनी विदर्भातील विविध समस्यांवर चर्चा केली.ज्यात प्रामुख्याने शेती,शेतकरी आत्महत्या, गोसेखुर्दचे पाणी,शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा,वाढती बेरोजगारी,आरोग्य व्यवस्था, स्थानिकांना रोजगार,कर्जमाफी,जमिनीचा फेरफार आदींचा यात समावेश होता.
Jay vidarbha sena
विदर्भासाठी कुणाचीही सोबत मान्य
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा फारपूर्वी पासून प्रलंबित आहे.आंध्रप्रदेशच्या धर्ती विदर्भ झाला पाहिजे.जो कोणी हा विषय हाताळेल,आम्ही त्यांची साथ देऊ,असे ही बिसेन म्हणाले.
नव्या पक्षाच्याया स्थापणेमुळे चंद्रपुरातील प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी जय विदर्भ सेनेने दाखवली आहे, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सदस्यता अभियान ही सुरू करण्यात आले असून ग्रामीण भागात पक्ष वाढत असल्याची माहिती बिसेन यांनी यावेळी दिली.
