News34 Sindewahi
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही- : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव (तू) - गुंजेवाही रोड वरील मरेगाव (चक) जवळ अनियंत्रित ट्रॅक्टर पलटी होऊन इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक २३ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली.
सिंदेवाही पंचायत समिती सदस्य राहुल पोरड्डीवार यांच्या मालकीचा विना नंबर प्लेट असलेला आयशर ट्रॅक्टर घेऊन प्रेमा सुधाकर माहुर्ले ( वय -२४रा. पवना) व दिपक बापूजी चौधरी (वय ४०, रा. पवना) हे सिंदेवाही वरुन रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास पवनपार येथे जात होते.
मात्र, सदर ट्रॅक्टरवरील मरेगाव येथे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन दिपक बाबुजी चौधरी (वय ४०) हा इसम जागीच ठार झाला तर, प्रेमा सुधाकर मोहुर्ले हा गंभीर जखमी झाला. Accident
मृतक दीपक चौधरी हा पंचायत समिती सदस्य राहुल पोरड्डीवार यांच्याकडे Supervisor म्हणून कामाला असल्याचे कळते.
जखमी प्रेमा सुधाकर मोहुर्ले याला अपघातानंतर तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सिंदेवाही पोलिसांनी आरोपी वर 279 ,304(अ) भादवि सहकलम 184 नुसार गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शंकर राहुत करत आहेत.
