News34 Ghughus
घुग्घुस :- 19 फेब्रुवारीला घुघुस शहरात जामिनावर बाहेर आलेल्या 25 वर्षीय कादिर शेख या युवकाची बँक ऑफ इंडिया समोर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात करीत आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार केले.
कादिर शेख हत्या प्रकरणात पोलिसांनी आधी 2 तर दुसऱ्या दिवशी 4 व एका अल्पवयीन आरोपीला अटक केली, या प्रकरणी एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Murder case
सदर हत्या जुन्या वादातून झाली असल्याची माहिती मिळाली असून 143,147, 148,120 (ब) 107, 302 भांदवी अन्वये गुन्हा दाखल करून शिवा गोनेवार, राजेंद्र कंकटवार, अतुल वनकर, अविनाश वनकर, सदाम शेख, तेजा अशा सहा व एक अल्पवयीन आरोपीला अटक केली व आरोपीना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली. Crime
दिनांक 19 फेब्रुवारीच्या रात्री कादिर शेख हा घरी होता त्याला भ्रमंनध्वनी करून बोलविण्यात आले यामुळे तो बहिणीला दोन मिनिटात येतो म्हणून बाहेर गेला, त्याच दरम्यान आरोपीने कादिर शेख याच्याशी वाद घातला व डोळ्यात मिरची पावडर टाकून मानेवर, हातावर व डोळ्यावर वार करून हत्या केली. Murder mystery
पुढील तपास पोनि बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संजय सींग करीत आहे.
