लता मंगेशकर म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान : विजय वडेट्टीवार
News34 Chandrapur
चंद्रपूर : दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लतादिदिंचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. पण आता तो सूर लुप्त पावला. लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती.
दिदी भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरल्या, असे भावनात्मक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
लतादिदी कीती महान होत्या हे सांगतांना वडेट्टीवार यांनी सांगीतले की, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार "पद्मभूषण", १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार "पद्मविभूषण"ने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल "भारतरत्न" या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. त्यांच्या जाण्याने एक जागतिक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज गायिका म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून गेल्या हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे मंगेशकर बहिण भावंडांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
The end of the vocal age
असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Lata Mangeshkar
लतादीदीनी गायन क्षेत्रात केलेला संघर्ष अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांनी त्यांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घातली .त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न, निःशब्द झाले. त्यांच्या या दीर्घ गान प्रवासात त्यांचे सूर कधी अंगाई झाले, कधी तरुणाईचा आवाज झाला , अलवार प्रेमाचे प्रतीक झाला, या स्वर्गीय सुरांनी अनेकांचे भावविश्व समृद्ध केले. ये मेरे वतन के लोगो अशी आर्त हाक भारतीयांना देत लतादीदीनी शहीदांच्या बलिदानाची गाथा मांडली. मेरी आवाज ही पहचान है असे म्हणणाऱ्या दीदी त्यांच्या असंख्य गीतातुन आमच्या सदैव स्मरणात राहतील असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. Loss of music and singing
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. जगभरात कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले आहेत.
स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही... अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही...”
त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
बाळू धानोरकर, खासदार
चंद्रपूर- आर्णी- वणी लोकसभा क्षेत्र
संगीत व गायन क्षेत्रातील 'गानकोकिळा' लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील.
नाम गुम जायेगा,
चेहरा ये बदल जायेगा,
मेरी आवाज़ ही, पहचान है गर याद रहे
लतादीदींच्या आवाजाचे स्वर आसमंतात कायम गुंजत राहतील. लतादीदींची जागा भविष्यात कोणी घेऊ शकणार नाही. इतका ठेवा त्यांनी देशाला दिलेला आहे. त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून आपले संपूर्ण जीवनच देशाला समर्पित केले हा एक मोठा त्याग आहे. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
सौ प्रतिभा धानोरकर
आमदार, भद्रावती - वरोरा मतदार संघ
ए मेरे वतन के लोगों जरा आंख में भरलो पानी
अश्या अमूल्य स्वरांने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी गाणंकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशातील संगीत क्षेत्र स्तब्ध झाले आहे.
आपल्या आवाजाने अनेक दशके गाजविणाऱ्या लतादीदी आपल्यामधून निघून गेल्या, यावर विश्वासच बसत नाही आहे.
लतादीदिंचे स्वर अजरामर झाले असून त्यांची कमतरता संगीत व गायन क्षेत्रातील झालेली हानी भविष्यात कुणीही पूर्ण करू शकत नाही.
संदीप गिर्हे - जिल्हाप्रमुख, शिवसेना, चंद्रपूर
