News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभुमी परिसर सौंदर्यीकरण व वाचनालय तसेच लगतच्या लंगडा मारुती मंदिर परिसर सौंदर्यीकरण खनीज विकास निधीतून होणार आहे.
राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.एक महिन्यापूर्वीच 50 लक्ष खर्च करून येथील रस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.
आता या दोन्ही ठिकाणीचा विकास होणार लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे कळते. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, सभापती सौ.वांढरे, नगरसेविका सौ.कांबळे, गटनेता विक्रण येरणे,सभापती राहूल उमरे, नगरसेवक मेश्राम, पापय्या पोन्नमवार, प्रा.डॉ.दुधगवळी यांच्यासह इतरांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
