News34 Gadchandur
गड़चांदुर - तालुक्यातील मांडवा येथे मावस भावानेच अल्पवयीन चुलत बहिणीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवार दिनांक १५ ला सकाळच्या सुमारास घडली.
Sister sexually abused
प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही तिचा मावसभाऊ सोबत घरातील खाटेवर झोपून होते. पीडितीचे आई-वडील कामात असताना संधी साधून पीडित मुलीसोबत तो झोपून असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या कपड्यावर रक्त दिसल्यानंतर तिला आई वडीलानी कोरपना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने तपासणी करून याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. Abused पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात कलम ३७६ अ ब भांदवी ६ पॉस्को Posco अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सदाशिव ढाकणे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे व पोलीस करीत आहे.
