चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील वडगाव, आंबेडकर नगर, लक्ष्मीनगर या भागांमध्ये अस्वल फिरत असल्याने सभाव्य धोका लक्षात घेऊन झाडेझुडपे काढण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. रविवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अधिकाऱ्यांसह आंबेडकर नगर भागांमध्ये भेट देऊन पाहणी केली.
Mayor chandrapur
शहर महानरपालिका क्षेत्रात नागरीकांच्या मालकीचे अनेक खुले भूखंड आहे. मात्र तिथे बांधकाम केलेले नसल्यामुळे हे मोकळे भुखंड विविध प्रकारच्या आजारचे उगमस्त्रोत ठरत आहे. शिवाय मनपा हद्दीच्या सीमाभागातील खुल्या भूखंडावर झाडेझुडपे वाढून जंगली श्वापदासाठी सुरक्षित ठिकाण निर्माण होत आहे.
Chandrapur municipal corporation
पाहणी दौऱ्यादरम्यान सभागृहनेता देवानंद वाढई, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल शेळके यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.