News34 Chandrapur
ब्रह्मपुरी: रानटी डुकराच्या शिकारीसाठी बारूद गोळा शेत शिवारात अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली त्यात अज्ञात आरोपीची मोटार सायकल घटना स्थळावर आढळून आल्याने त्या आधारावर तपास केला असता Accused नावे संजय नामा केडेलवार वय(३५) व अनिल मुखरू खेडकर वय (३३) रा. इंदिरानगर बर्डी आरमोरी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी विरुद्ध अ. क्रं.
For hunters
ब्रह्मपुरी पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज येथील फिर्यादी संतदास रामदास नखाते व जनार्दन विठोबा ठाकरे यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेतशिवारात चराईसाठी बैल व गाय नेली असता. गांधिनगर आरमोरी बर्डी येथे वास्तव्याने राहत असणाऱ्या दोन आरोपींनी रानटी डुकराच्या शिकारी साठी निलज-पाचगाव शेत परिसरामध्ये Ammunition भरलेले गोळे अत्यवस्थ अवस्थेत डुकरांसाठी टाकले होते. मात्र Wild boar ऐवजी ते बैल गायीने खाल्ल्याने तोंडात तो गोळा फुटून बैल व गाय गंभीर जखमी झाले त्यानुसार फिर्यादी यांनी वन विभागाला सूचना करीत ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. ammunition storage
त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत तपास केला असता दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अ. क्रं.६७/२३ कलम ४२९.३४ अंतर्गत गुन्हा नोंद करीत कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत