News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
बंजारा समाजाचे संत सतगुरू सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती गडचांदूर येथे मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम बंजारा समाजाचे थोर संत रामराव महाराज,संत सेवालाल, जगदंबादेवी,माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, गोरशिकवाडी संस्थाप्रमुख काशीनाथ नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी वाशीम येथील प्रा.रतन राठोड यांची मुख्य मार्गदर्शक तर मित्रांगण युवा मंच अध्यक्ष हितेश चौहान, विनायक पवार, विनायक राठोड, कनीराम पवार,गुलाब राठोड, शंकर राठोड, सुनील चौहान,माधव पवार,सचिन पवार, राम पवार,इंदल राठोड इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती."रपया कटोरो पाणी वगजाय" संत सेवालाल महाराज यांनी शेकडो वर्षांपूर्वी म्हटलेल्या या वाक्याची आठवण करून देत गौरव हितेश चौहान यांनी भाषणाद्वारे सेवालाल महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर लवकरच गडचांदूर येथे बंजारा समाज स्वतःची जागा घेऊन सेवालाल महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची माहिती हितेश चौहान यांनी आपल्या भाषणात म्हटले.प्रा.विनोद चौहान यांनी समाज भवन बांधकामासाठी 5 हजार रुपयांचा धनादेश दिला. आपल्या भाषणाद्वारे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार्या गौरव चौहान याला पीएसआय राहूल चौहान लिखीत पुस्तक भेट देऊन त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती असलेले प्रा.रतन राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकत बंजारा समाजाच्या इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. संचालन प्रा.आदे सर यांनी तर प्रास्ताविक नागपूर विभाग प्रमुख गोविंद पवार यांनी केले. सदर कार्यक्रमात बंजारा समाज बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनीराम पवार, सुनील चौहान,विकी राठोड सह इतरांनी परिश्रम घेतले.
