News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - : तालुक्यातील खालवसपेठ येथे आज दि. 19 फेब्रुवारी 2022, शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 392 व्या जयंती दिनानिमित्त Shiv Janmotsav ceremony व विविध स्पर्धाचे आयोजन 'छ. शिवाजी महाराज विद्यार्थी परिषद खालवसपेठ' यांच्या वतीने करण्यात आले. त्यामध्ये सामान्यज्ञान स्पर्धा, Kabaddi स्पर्धा, दौड स्पर्धा व रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक व अध्यक्षा म्हणून जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
तरुणांनो, शिवबांचा आदर्श घेऊन शिवछत्रपतीसारखे शूर व चारित्रवान बना. शिवाजी महाराजांनी आयुष्यभरात व्यसन केली नाही. तरुणांनो तुम्ही पण व्यसनांपासून दूर राहायला हवे. कारण आपणास सक्षम भारत घडवायचा आहे. फक्त जयंती साजरी करून चालणार नाही, तर छत्रपतींचे विचार आत्मसात करायला हवेत, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी सांगितले.
याप्रसंगी वर्षाताई लोनबले (पं. स. सदस्या), नोकाजी पा. शेंडे, हसन वाढई, दीपक वाढई (सरपंच), निमगडे (उप सरपंच), संदिप गुरनुले, नंदाताई शेंडे (पो. पा.), दिलिप वाडके, गजानन शेंडे, उषा शेंडे, साधनाताई वाळके, शालू शेंडे, रवी निकुरे, स्नेहा चौधरी, प्रीती निकुरे, कोडापे मॅडम, अमित कोकोडे, हरिश्चंद्र कुळमेथे, नागेश बरवे, सुमित वाळके व शिवजयंती उत्सव खालवसपेठ येथील युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
