News34 gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना,गडचांदूर मार्गावरील कातलाबोडी फाट्याजवळ एका पिकअप वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंदाजे 7 च्या सुमारास घडली.
Road accident
एका दुचाकीवर तीन जण स्वार असल्याचे बोलले जात असून हे तरूण कोरपना वरून रामपूरकडे जात असताना गडचांदूरच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
report on road accident
report on road accident
कोरपना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.कोरपनाचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

