News34 Chandrapur
चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे जटपुरा गेट ते गांधी चौक पर्यंत "खिळे मुक्त झाडं"अभियान राबविण्यात आले. Advertising banner
जाहिरात फलकांनी संपूर्ण शहर व्यापून टाकले असता आता रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचा उपयोग फलक लावण्यासाठी केला जात आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात फलक लावलेले दिसून येते. प्रसिद्धीच्या हौसेपोटी आता डेरेदार वृक्षांना हानी पोहोचविली जात आहे. हा प्रकार सर्रास सुरू असला आहे.
झाडांनाही ही वेदना होतात याचा विचार कोणीच करत नाही. नागरिकांची ही कृती झाडांना हानिकारक ठरत आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि राष्ट्रीय हरित लवाद यात झाडा संदर्भात अनेक कायदे स्पष्टपणे अधोरेखीत आहेत. तरी लोक बेजबाबदारपणे वागून झाडांवर खिळे ठोकून poster, बॅनर लावतात. खिळे कालांतराने गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो परिणामी झाडांचे आयुष्य कमी होत जाते.Nail free trees
"खिळे मुक्त झाडं" अभियानात राजीव शेंडे, हरप्रीत सिंग, गौरव वरारकर,विशाल पेंदोर, राजू पिसे, तुप्ती गौरकार, श्रेयश शेंडे, रश्मी कोटकर, मोना भगत, मयूर उरीते, अनिता पिसे, रिदम कोटकर, ज्योत्स्ना गौरकार, आशिष भरडकर, सोहम सुर्वे, सुरज नवले, सुरज हजारे, श्याम गोहणे, हर्ष पेंदोर, राहुल कोटकर आदींनी सहभाग घेतला.

