चंद्रपूर - दिनांक 19. 2. 2022 रोज शनिवार ला वनसंपदा इमारत उपवनसंरक्षक आलापल्ली येथे राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहनचालक वर्ग 3 कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर, Driving Employees Union यांची सभा पार पडली.
या सभेत श्री दीपक जी हिवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेसाठी खालील वाहनचालक पदाधिकारी मंडळी उपस्थित होते श्री नरेश जी सिडाम जिल्हा सचिव, श्री कांबळे जी जिल्हा संघटक, श्री अशोकराव नामेवार जी, आत्राम जी जिल्हा संघटक, श्री राकेश जी कराडे हे सर्व पदाधिकारी या सभेस उपस्थित होते! आल्लापल्ली भामरागड सिरोंचा वनविभाग येथील सर्व वाहन चालक बांधव हे सुद्धा उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणी ची सर्वानुमते श्री अशोकराव नामेवार वाहन चालक जिल्हा परिषद चंद्रपूर यांची (जिल्हा उपाध्यक्ष) चंद्रपूर जिल्हा म्हणून निवड करण्यात आली तसेच श्री मोजेस वाहन चालक भामरागड यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली श्री आत्राम जी आलापल्ली यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली, श्री गुलबे जी वाहन चालक सिरोंचा यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली व सर्व बाबीवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली वाहन चालकाच्या समस्या अडी-अडचणी सर्व पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या व सर्वांच्या अडचणी सोडवुन देण्यासाठी सर्वासमक्ष जबाबदारी स्वीकारली! आणि आज शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटनेतर्फे जे काही रिक्तपदे होती ती भरण्यात आली. रिक्त पदे भरण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहनचालक बांधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
