News34 gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य प्रहारच्या वतीने गडचांदूर येथे 19 फेब्रुवारी रोजी स्थानिक शिवाजी चौक येथे मोफत ई-शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठाणेदार सत्यजित आमले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम,शिवसेनेचे इर्शाद कादरी,अक्षय गोरे इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शासनाने असंघटीत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुदान देताना येणाऱ्या अडचणीसाठी कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले. मात्र कार्ड काढुन देण्यासाठी कामगारांच्या अज्ञानाचा फायदा घेत लूट केली जात असल्याचे आरोप होत असून हे प्रकार थांबविण्यासाठी प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या संकल्पनेतून प्रहारतर्फे ही मोफत नोंदणी शिबीर राबविण्यात आली. याचा लाभ कामगारांनी घेतला.प्रहारचे बिडकर यांच्यासह पंकज माणूसमारे,शैलेश विरूटकर, सागर गुडेल्लीवर,इंजि.अरविंद वाघमारे,प्रतीक खैरे इत्यादी कार्यकर्त्यांनी अंदाजे 30 पेक्षा जास्त श्रमिकांच्या ई-श्रमची नोंदणी करून कार्ड दिले. असंघटीत कामगारांसाठी आयोजित सदर शिबिराचा कामगारांनी लाभ घेतला असून यापुढे सुद्धा कोणालाही ई-श्रम कार्ड काढायचे असल्यास त्यांनी प्रहार कार्यालयात येऊन मोफत काढुन घ्यावे असे आवाहन प्रहारतर्फे यावेळी करण्यात आले आहे.
