चंद्रपूर - मागील 4 महिन्यापासून राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे, राज्य परिवहन विभागाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे अशी कर्मचारी व कामगारांची मागणी आहे. Msrtc
या मागणीसाठी 4 महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे सतत आंदोलन सुरू असून आतापर्यंत अनेक कामगार व कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले.
यावर उपाययोजना करीत परिवहन विभागाने कंत्राटी पद्धतीवर वाहक व चालकाच्या जागा भरल्या मात्र गरिबांची एसटी पूर्णपणे रस्त्यावर उतरली नाही.
28 फेब्रुवारीला वणी यवतमाळ जिल्ह्यातून घुघुस मार्गे चंद्रपूरला येत असताना एसटी बस क्रमांक Mh40N9429 चांदा क्लब ग्राउंड समोरुन जात असताना अचानक चालकाचा एसटी बसवरून नियंत्रण सुटले असता बस दुभाजकावर चढली.
या जीवघेण्या दुर्घटनेत प्रवासी सुखरूप असले तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाश्यांचा जीव हातात आला होता. St bus accident
