News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे आद्यशक्ती, महिषासुर वर्धिनी माँ.दुर्गा देवीची स्थापना मंदिराच्या नियोजित स्थळीं करण्यात आली असून मुल येथील दुर्गा मंदिर जिल्ह्यातील दुर्गा मातेचे जागृत देवस्थान म्हणून आज प्रसिद्ध होऊन नावारूपास आले आहे.दरवर्षीच नवरात्र दुर्गा उत्सवात आनी स्थापना दिवशी परिसरातील मातेचे हजारो भक्तगण मोठया भक्ती भावाने,श्रद्धेने माँ.देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीला देखील भाविक येत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २६ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला ६ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मूर्तीचा अभिषेख दुपारी २ वाजता कोरोना योद्धांचा सत्कार व सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात समस्त संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी माँ. दुर्गा देवीच्या भक्त जणांनी अभिषेख पूजेला,सत्कार समारंभाला,आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान मंदिर समितीच्या विस्वस्थ मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे.
