News34 Chandrapur
चंद्रपूर दि. 25 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 20 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.
covid 19 cases today
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 3, भद्रावती 2, सावली 1 तर पोंभूर्णा येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा ,कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
covid 19 cases
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 921 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 314 झाली आहे. सध्या 40 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 75 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 74 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे. covid 19 booster vaccine
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
