News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नामदार नवाब मलिक Nawab malik यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता ईडीने दडपशाही करत खोट्या गुन्ह्यात अटक केल्याच्या निषेधार्थ 25 फेब्रुवारी रोजी गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला.
Mahavikas aghadi sarkar
महाविकास आघाडीतर्फे केंद्रातील bjp government व ईडीचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्रातील भाजप सरकाच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र सरकार विरूद्ध सुडबुद्धीने सुरू असलेल्या ईडीच्या कारवाया बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू व होणाऱ्या परिणामास केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.सदर धरणे आंदोलनात कोरपना तालुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
