News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यात मुल तालुक्यात मोठा जनाधार आहे. मात्र, जिल्हा परीषद, पंचायत समिती असो व्हा नगर परिषद पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत नसल्याने कार्यकर्त्यांना सामान्य माणसाची लोकोपयोगी कामे करतांना अडचणी येत आहेत. यामुळे पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व्हेक्षण करूनच जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ असे आश्वासन चंद्रपूर - वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी दिले आहे. मुल तालुक्यातील राजगड येथे काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार देवराव पाटील भांडेकर, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, मेळाव्याचे आयोजक ओबीसी विभागाचे जिल्हा सचिव अजिंक्य पाटील मारकवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारच्या चुकीचे धोरणांवर कडाडून टीका केली. Denomination नोट बंदी सारख्या निर्णयामुळे कुणीही मोठी व्यक्ती बँकेचे पुढे रांगेत उभा राहिला नाही, पण मोदींनी माझ्या ग्रामीण भागातील भगिनी, मजूर, सामान्य माणसाला मात्र आपले काम सोडून मजुरी बुडवून बँकेपुढे रांगेत उभे केले, नवीन रोजगार दिला नाही, उलट रोजगार हिरावून घेतले, काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या कंपन्या विक्रीस काढल्या. Congress या भागातील घरकुलाचे प्रश्न असो वा पिण्याचे पाण्याची समस्या आपण स्वतः याकडे लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. Mp balu dhanorkar
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचे प्रतिमेला अतिथी चे हस्ते माल्यार्पण करून झाली. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांचा गावकऱ्यांचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार देवराव पाटील भांडेकर, प्रकाश पाटील मारकवार यांनीही आपले भाषणातून या भागातील धान उत्पादक शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य पाटील मारकवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी मंडळी आणि परिसरातून शेतकरी बांधवांनी उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी जनतेचे निवेदन स्वीकारून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
