News34 Chandrapur
लतादिदींच्या निधनाने महान व मधुर सुरांचा अंत - हंसराज अहीर
चंद्रपूर - स्वरसम्राज्ञी, गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील दैवी स्वर निमाला असून मधुर सुरांचा व महान युगाचा अंत झाला आहे.
गायन कलेच्या विविधांगी प्रकारात त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल विद्यमान व कित्येक भावी पिढ्या सदैव स्मरण करतील. त्यांच्या दुःखद निधनामुळे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, नाट्य, चित्रापट आदी क्षेत्राशी निगडीत चळवळीची फज्ञर मोठी क्षती झाली असल्याची शोकसंवेदना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.
लतादिदींनी आपल्या सुमधुर स्वरांनी शब्दांना साज व अर्थपुर्णतः दिली. त्यांनी गायीलेल्या अनेक भाषांमधील गितांनी श्रोतुवर्ग सदैव न्हाऊन निघायचा. गितांना आपल्या सुरातून जिवंतपणा दिला. त्यांच्या दैवी गायकीने खÚया अर्थाने भाषा अलंकृत ठरली आहे अशा महान गानसम्राज्ञींच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरीमित हानी झाली आहे. त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.
लतादिदींनी आपल्या सुमधुर स्वरांनी शब्दांना साज व अर्थपुर्णतः दिली. त्यांनी गायीलेल्या अनेक भाषांमधील गितांनी श्रोतुवर्ग सदैव न्हाऊन निघायचा. गितांना आपल्या सुरातून जिवंतपणा दिला. त्यांच्या दैवी गायकीने खÚया अर्थाने भाषा अलंकृत ठरली आहे अशा महान गानसम्राज्ञींच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरीमित हानी झाली आहे. त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.
Veteran singer Lata Mangeshkar dies at 92
मेरी आवाज ही पहचान हे....!
गानसम्राज्ञी लता दीदी सदैव स्मरणात राहतील - आ. किशोर जोरगेवार
स्वर्गीय आवाजाच्या धनी, विश्वप्रसिध्द गायिका भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता दीदीच्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून निघणे कधीही शक्य नाही. गानसम्राज्ञी लता दीदी आपल्याला सोडून जाण हे फक्त शब्दातील आहे, वास्तविकतेमध्ये त्या आपल्या सुरेल गाण्यांच्या आठवणीने सगळ्यांच्या स्मरणात सदैव राहतील. अश्या भावना आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या आहे.
Lata Mangeshkar Passes Away
“मेरी आवाज ही पहचान हे...” “ज्योती कलश झलके..” “तुम आ गये हो...” या सारख्या अगणित सदाबहार लतादीदींनी गायलेली गाणे ऐकतच आमची पिढी मोठी झाली आहे. त्यांनी गायलेली भजने घरोघरी आज पण ऐकायला मिळते. त्यांचा स्वर्गीय आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करणारा होता. “ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी...” या सारखे देशभक्तीपर गीते ऐकून तरुणांच्या नसानसात देशप्रेम जागृत होतो. त्यांना भेटीकरिता जाणार होतो, परंतु प्रकृती अस्वस्थामुळे भेट न झाल्याची खंत आ. किशोर जोरगेवारांनी व्यक्त केली. त्यांच्या अश्या जाण्याने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची सुरेख गाणी ऐकून मोठी झालेली पिढी आणि त्यांच्या गाण्याचे रियाज करून संगीतविश्वात पदार्पण करणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात त्या सदैव राहणार आहे. आज त्यांच्या सहवास जरी नसला तरी त्यांच्या स्मृति सुगंध देत राहील, त्यांचा रुपात देशाने एक गौरव हरवला आहे. अश्या शब्दात आ. किशोर जोरगेवार यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
National day of mourning
लतादीदी म्हणजे संगीत क्षेत्रातील देशभक्त : महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर म्हणजे संगीत क्षेत्रातील देशभक्त होय. अत्यंत साधी राहणी आणि संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतले.
ऐ मेरे वतन के लोगों,
ज़रा आँख में भर लो पानी
दिदीचा जादुई आवाज आणि देशाच्या संगीत क्षेत्रासाठी दिलेले बहुमुल्य योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शोकभावना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या आहेत.
