चंद्रपूर - रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिप जॉईंट च्या हाडांचा मृत्यू होतो, मृत झालेले हाड कमकुवत होते त्यामुळे गोलाकार हिप जॉईंट सपाट होतात.
जॉईंट सपाट झाल्याने झीज होत जॉइन्टला कायमचे नुकसान होते.
यामुळे हिप रिप्लेसमेंट सारख्या शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे मात्र ही शस्त्रक्रिया अत्यंत वेदनादायी आहे, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने वेदनारहित व्हाव्या यासाठी चे हाडांचे विशेषज्ञ डॉ.अलंकार रामटेके यांनी यावर रिसर्च करीत ते यशस्वी करून दाखविले आहे. orthopedic
मागील 16 वर्षात डॉ. रामटेके यांनी 3 हजार 500 च्या वर प्राथमिक सांधे प्रत्यारोपण प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहिला आहे.
Wockhard hospital मध्ये शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रक्रियेचा वापर डॉ.रामटेके यांनी सुरू केला आहे.
या शस्त्रक्रियेत त्रास कमी व रुग्णालयातील रहिवास कमी करत, शस्त्रक्रियेवरील खर्च कमी होण्यास अनेकांना फायदेशीर ठरत आहे. hip replacement
जेष्ठ नागरिकांमध्ये अनेक व्याधी वयानुसार होत असतात त्यामुळे सांधे प्रत्यारोपण च्या संख्येत वाढ होते मात्र आता ही समस्या अनेक युवकांमध्ये ही दिसायला लागली आहे. Recovery
दारू च्या आहारी जाणे यामुळे आज युवकांना या समस्येचा बळी पडलेल्यांची संख्या जास्त आहे.
ही समस्या उदभवू नये यासाठी काय करावे?
तर आपण नियमित व्यायाम करावा, नेहमी पायदळ चालण्यावर भर द्यावा.
मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी डॉ. अलंकार रामटेके यांनी विदर्भातील जनतेला या शस्त्रक्रियेपासून त्रासमुक्त करण्यासाठी शीघ्र स्वस्थ लाभ सांधेरोपन प्रक्रियेची सुरुवात केली आहे.