चंद्रपुर : या ना त्या कारणाने चंद्रपुर महानगरपालिकेतील घोटाळे दररोज उघडकिस येत असतात. अशातच घोटाळ्यांच्या मालिकांचे सत्र पुढे चालवीत चंद्रपुर महानगरपालिकेने केलेल्याच कामांची नव्याने निविदा काढून भ्रष्टाचाराचा कळस रचला आहे, असा आरोप सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष तथा महानगर निवडणूक प्रभारी आम आदमी पार्टी, चंद्रपुर द्वारा करण्यात आलेला आहे. Aap chandrapur
महानगरपालिका हद्दीतील वडगाव प्रभाग प्रभाग येथील कॉक्रीट रस्ते, नाल्या, कंपाउंड वाल, पेव्हींग ब्लॉकचे काम, फर्नीचर व पेंटींगचे काम आदी कामांची नविन निविदा १० जानेवारी २०२२ ला काढण्यात आली. तशी रीतसर निविदा जाहीरात वृत्तपत्राला देण्यात आली. सदर कामे ही जवळपास करोडो रुपयांची आहे. या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र वास्तविक ही सर्व कामे याअगोदरच झालेली आहेत. तरी या कामांची नविन निविदा जाहीरात काढून महानगरपालिकेने उघड उघड भ्रष्टाचाराचा घाट घालून जनतेच्या करातून गोळा केलेले एक करोड रुपये स्वताचे खिशात घालण्याचा प्रताप मनपा पदाधिकारी यांनी सुरु केला आहे. Tender
या अगोदर Sweepers सफाई कर्मचाऱ्यांच्या श्रमावर स्वच्छतेत ३ स्टार मानांकन मिळवुन चंद्रपूर मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरात मोठ-मोठे फलक लावुन गवगवा करणारी महानगरपालिका मात्र आता याच भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी केलेले मागील चार वर्षात अमृत योजना घोटाळा, Solid waste scam घनकचरा घोटाळा, कोविड घोटाळा, डबा घोटाळा, आझाद बाग घोटाळा, Vip व्ही आय पी नंबर घोटाळा तथा कोट्यावधी रुपयांच्या लेखापरीक्षणात अनियमितता याप्रमाणे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करुन अनेक घोटाळे मनपा सत्ताधिकारी यांनी केले आहे. याच घोटाळ्यातील ही मालिका आहे.
या प्रकाराचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करते. व या निविदा जाहीरातीची व सदर कामांची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी नगर विकास विभाग तथा विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तात्काळ सदर निविदा रद्द करुन महानगरपालिकेने या प्रकाराची माफी मागावी, अन्यथा आम आदमी पार्टी महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडेल, असे जाहीर केले आहे.
यावेळी सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष तथा मनपा प्रभारी, मयुर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, सिकंदर सागोरे महानगर उपाध्यक्ष, राजेश चेडगुलवार जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, राजु कुडे महानगर सचिव, बबन क्रिष्णपल्लीवार, दिलीप तेलंग आदी उपस्थित होते.