चंद्रपूर /Tech News - व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय अॅप्स पैकी एक आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी युजर्स आहेत. आपण याचा वापर जवळच्या लोकांशी संवाद साधन्यासाठी आणि त्यांना फोटो, व्हिडीओ किंवा महत्वाचे Document डॉक्यूमेंट शेअर करण्यासाठी करतो. Whatsapp व्हॉट्सअॅपने आपलं अर्ध काम सोपं केलं आहे. परंतु हे लक्षात घ्या की, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, ज्यामुळे आपल्याला व्हॉट्सअॅपचे जेवढे फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. ज्याची आपल्याला माहिती नसते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅटिंग अॅप्सबद्दल बोलायचे झाले, तर बहुधा व्हॉट्सअॅपचे नाव सर्वात पहिल्या स्थानावरती आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं व्हॉट्सअॅपचा वापर करताता, त्यामुळे येथे ठग्यांना त्यांना टार्गेत करणं सोपं जातं.
अलीकडेच एक नवीन scam घोटाळा समोर आला आहे, ज्याला Rediroff.ru असे नाव देण्यात आले आहे. या घोटाळ्याद्वारे, व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती त्यामध्ये भरतात. ज्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे देखील चोरीला जात आहेत. हा घोटाळा काय आहे आणि तुम्ही यापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता ? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Rediroff.ru घोटाळा कसा काम करतो ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅटिंग अॅप्सबद्दल बोलायचे झाले, तर बहुधा व्हॉट्सअॅपचे नाव सर्वात पहिल्या स्थानावरती आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं व्हॉट्स अॅपचा वापर करताता, त्यामुळे येथे ठग्यांना त्यांना टार्गेत करणं सोपं जातं. यामधील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, वापरकर्त्यांना नवीन वेबसाइटवर नेले जाते जेथे त्यांचे नाव, वय, पत्ता आणि बँक तपशील यासारखी माहिती घेतली जाते. अशा प्रकारे, वापरकर्ते रिवॉईसाठी त्यांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांसोबत शेअर करतात.
सुरक्षित राहण्यासाठी हे काम करा
जर तुम्हाला या घोटाळ्यापासून लांब राहायचे असेल, तर तुमच्यापर्यंत कोणतीही लिंक आली तर ती काळजीपूर्वक वाचा आणि मगच त्यावर क्लिक करा. जर ही स्पॅम लिंक असेल आणि त्यात ' Rediroff ru ' दिसत असेल, तर ती स्पॅम म्हणून चिन्हांकित करून त्वरित हटवा. जर चुकून तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केले असेल, तर ती लगेच बंद करा आणि anti virus अँटी - व्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन स्कॅन करा. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर असे कोणतेही अॅप दिसले की, जे तुम्ही डाउनलोड केलेले नाहीत किंवा तुमच्या उपयोगाचे नाहीत, तर ते लगेच तुमच्या स्मार्टफोनमधून अनइंस्टॉल करा.