प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - फुले दांम्पत्य सन्मान दिन १ जानेवारी १८४८भारतातील पहिली मुलींची शाळा महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली याचे औचित्य साधून नवीन वर्षाच्या आगमना प्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री. हसनजी वाढई यांचाही आज वाढदिवस या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून थोर महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हसनजी वाढई यांनी फुलझरी, आगडी, कांतापेठ ,केळझर,चिरोली या गावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ,शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील तब्बल 400 पुस्तकाचे व गरीब व निराधार नागरिकांना 500 ब्लॅंकेटचे वाटप हसन वाढई यांचे हस्ते करण्यात आले.
क्रांतिसूर्य महात्मा फुले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या शिक्षणाचे दार उघडले. असंख्य हाल- अपेष्टा सहन करून शिक्षणाचे महत्त्व यांनी पटवून दिले. त्यांच्यामुळेच आज महिलांनी शैक्षणिक,क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. अशा या महान महामानवांच्या विचारांना प्रेरणा मिळावी, तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत म्हणून वाढदिवसानिमित्य हसनजी वाढई यांनी ग्रामीण भागात फुलझरी, आगडी, कांतापेठ ,केळझर,चिरोली इथे महामानव यांच्या विचारांवर तब्बल 400 पुस्तक वितरणाचा उपक्रम राबविले.
तसेच आता हिवाळ्याचे थंडीचे दिवस असल्याने हिवाळ्यात रस्त्यावर राहणारे, फुटपाथवर झोपणारे यांच्याकडे पुरेसे अंथरून पांघरून साहित्य नसते. याचेच भान ठेवून गरीब व गरजू नागरिकांना जवळपास 500 ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला. एवढेच नव्हेंतर नलेश्वर गायमुख देवस्थान येथे भोजनदान दिला. या उपक्रमांतर्गत मुलांना पुस्तक वाटप केल्याने आणि गरीब गरजू व्यक्तिंना ब्लॅंकेट वाटप केल्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या आणि गरीब नागरिक परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने माझे कार्य व निरंतर सेवा अशीच चालू राहील, अशी भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मा.हसनजी वाढई यांनी व्यक्त केले.
हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ वाढई, राकेश ठाकरे, सुधीर वाडगुरे, वैष्णव पोडचालवार, हर्षल भूरसे,प्रदून्य कांदीकुरवार रोशन भेंडारे, दुष्यांत महाडोळे, आशिष गणवीर, जितू टिंगूसले, संदीप भोयर, हरीश मोहुर्ले, सुरज मांदाडे, सुमित मांदाडे, पवन मोहुर्ले, दिनेश गुरनुले, मोहन कुंडलवार, प्रथमेश यामावार व मित्रांनी अथक परिश्रम घेतले.
हसनजी वाढई यांच्या चालविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.