प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील सर्व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची covid 19 vaccination कोविड लसीकरण आणि तिसर्या लाटे साठी करावयाच्या उपाययोजना यासाठी बैठक उपविभागीय अधिकारी मा. डॉ दीप्ती सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, सर्व व्यापारी आस्थापना यांनी आपल्या कडील सर्व कर्मचारी यांनी लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या असाव्यात, दोन्ही डोस घेतलेल्या ग्राहकाला सेवा पुरवावेत. मास्क, सॅनीटायझर, सामाजिक अंतर याचे पालन करावे. या सभेत संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, उमेश पाटील पोलिस निरीक्षक, डॉ. बानोत अध्यक्ष बल्लारपूर मेडिकल असोसिएशन यांनीही Covid third wave कोविड च्या तिसर्या लाटे साठी करावयाच्या उपाययोजना बद्दल माहिती दिली. सतिश साळवे नायब तहसीलदार, नरेश मुंधडा, राजू मुंधडा, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन, चौकसे अध्यक्ष मेडिकल शॉप असोसिएशन, बुच्चय्या अध्यक्ष न्हावी संघटना, हेमंत मानकर स्वत धान्य दुकान संघटना, ईत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
